धार्मिक श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे 20 गुंठे जागेत होणार भव्यदिव्य मंदिर, पतके कुटुंबाचा मंदिरासाठी पुढाकार
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर निळोबाराय महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पारनेर येथील संजय पतके, विजय पतके, अजय पतके यांचे वडील कोंडीभाऊ पतके मातोश्री सुमन कोंडिबा पतके यांच्या हस्ते पिंपळनेर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
अजय पतके म्हणाले, अनेक वर्षापासून आईची इच्छा होती. श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर म्हणूनओळखले जाणारे निळोबाराव यांच्या मायभूमीत संताजी महाराज जगनाडे यांचे मंदिर व्हावे म्हणून २० गुंठे जागेत मंदिर होणार आहे. यावेळी तिळवण तेली समाज महिला अध्यक्ष कमल देशमाने यांनी समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पारनेर शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या सुप्रिया प्रशांत पतके कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. सूर्यकांत काळे, गुरुमाउली अध्यक्ष दशरथ काळे, सेवा संस्था चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ओंकार काळे, नेव्हीमध्ये भरती झाल्याबद्दल आदित्य देवकर, आदिती देवकर, प्रवीण थोरात, स्नेहल काळे, वैष्णवी शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक चंद्रकांत काळे यांनी केले. आभार रोहिदास काळे यांनी मानले. याप्रसंगी रोहिदास काळे, शिरीष शेलार रामदास महाराज क्षीरसागर, शिवाजी काळे, बाबासाहेब दिवटे, उद्धव वालझाडे, तुकाराम काळे, महेश शेलार, बाळासाहेब शेजवळ, केशव शेलार, मदन रत्नपारखी, विनायक शेलार, कैलास शेलार, सुभाष शेलार, रवींद्र पतके, दत्तात्रय पतके, अविनाश काळे, दिलीपदेशमाने, रमेशपतके, रामचंद्र थोरात आदी उपस्थित होते.